छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा अड्डा उद्‌ध्वस्त

रायपूर – छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांचा एक अड्डा उद्‌ध्वस्त केला. या कारवाई दरम्यान ‘आयईडी’ निकामी करत असताना जिल्हा राखीव दलाचा एक जवान जखमी झाला, असे पोलिसांनी सांगितले. 

केंद्रीय राखीव पोलीस दल आणि जिल्हा राखीव दलाने संयुक्‍तपणे कारवाई करून गंगलूर पोलीस स्थानकाच्या हद्दीतील मारिवाडा-गोंगला गावाजवळच्या जंगलातील हा अड्डा उद्‌ध्वस्त केला, असे बस्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.

पोलिसांची चाहूल लागताच या अड्ड्यावरील नक्षलवाद्यांनी घनदाट जंगलामध्ये पळ काढला. या नक्षलवाद्यांचे गणवेश, आयईडी स्वीच, बॅटऱ्या, लोखंडी पॅलेट, माओवादी साहित्य, तंबू, बॅगा, औषधे आणि दैनंदिन वापराचे साहित्य या ठिकाणी बेवारस सोडून दिलेले आढळले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या ठिकाणी पेरून ठेवलेला ‘आयईडी’निकामी करत असताना अचानक स्फोट होऊन त्यामध्ये एक जवान जखमी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.