नवाजुद्दीन सिद्दीकीच्या ‘बोले चूडिया’चा टीजर प्रदर्शित.. पहा झलक

मुंबई – बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचा आगामी चित्रपट ‘बोले चूडिया’चा टीजर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात नवाजुद्दीन सोबत अभिनेत्री तमन्ना भाटियाही मुख्य भुमिकेत झळकणार आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीने ‘अब अपून को लाइफ में कोई लफड़ा नहीं चाहिए. बस रोमांस और फैमिली… #बोले चूडियां की पहली झलक’ या कॅप्शनसहीत आपल्या ट्विटरवरून हा टिजर शेअर केला आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन नवाजुद्दीनचा भाऊ शम्स नबाब सिद्दीकीने केले आहे. आत्तापर्यंत आपण नवाजुद्दीन सिद्दीकीला मारामारी करताना आणि व्हिलनच्या रोलमध्ये पाहिले आहे. मात्र, यंदा पहिल्यांदाच नवाजुद्दीन एका प्रियकराच्या भुमिकेत आपल्याला दिसणार आहे.

दरम्यान, राजेश भाटिया आणि किरण जवेरी भाटिया हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. या चित्रपटाचे चित्रिकरण राजस्थानमध्ये करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.