पुणे – नवाजुद्दीन सिद्दीकी किती भारी ऍक्टर आहे, हे सगळ्या जगाला माहिती आहे. आता तो म्युझिक अल्बमध्येही किती चांगला कलाकार आहे हे देखील सगळ्यांना समजणार आहे. त्याचा पहिल्या म्युझिक अल्बम “बारीश की जाये’ शुक्रवारी रिलीज करण्यात आला. डायरेक्टर अरविंदर खैरा, संगीतकार जानी आणि बी प्राक यांच्या जोडीने नवाजुद्दीनने प्रथमच संगीत क्षेत्रात पदार्पण केले आहे.
या म्युझिक अल्बममध्ये नवाजुद्दीनच्य बरोबर सुनंदा शर्मा देखील असणार आहे. या अल्बममधील गाणी एका सत्यघटनेवर आधारलेली आहेत. जानी यांनी ही गीते लिहीली आहेत. अरविंद खेरानी हा व्हिडीओ डायरेक्ट केला आहे. या व्हिडीओला बी प्राक यांनी आपला आवाज दिला आहे. हा व्हिडीओ युट्युब चॅनेलवर अपलोड करण्यात आला आहे. अरविंद खेरा हे पंजाबमधील दिग्दर्शक आहेत. त्यांनी आतापर्यंत 108 पेक्षा अधिक गाणी लिहीली आहेत.
नवाजुद्दीन सिद्दीकीने या गाण्यांवर दाखवलेली अदाकारी अगदी सर्वसामान्यांप्रमाणे असल्याने प्रेक्षकांना ही गाणी आपल्याच जीवनावर आधारलेली वाटतात. नवाजुद्दीन सिद्दीकीला नेहमीप्रमाणे या गाण्यांवर डान्स करावा लागलेला नसेल, पण त्याच्या चेहऱ्यावरचे भावच पुरेसे बोलके असल्याने डान्सची गरज भासलेली नसावी.