‘फादर्स डे’ निमित्त नवाजुद्दीन सिद्दीकीने शेअर केला अनोखा व्हिडीओ

मुंबई- ‘सॅक्रेड गेम्स’ मधील गणेश गायतोंडे म्हणजेच, अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने ‘फादर्स डे’ निमित्त एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात नवाजने एका अनोख्या अंदाजात ‘फादर्स डे’च्या शुभेच्छा दिल्या आहेत.

‘मला तीन वडील असून पहिल्या वडिलांनी मला भीती दाखवलीस तर, दुसऱ्याने हिंमत दिली आणि तिसऱ्याने, ज्याच्यावर मी सर्वांत जास्त प्रेम केलं, त्याने धोका दिला. मला माझ्या तिन्ही वडिलांना एकच गोष्ट सांगायची आहे, ‘हॅप्पी फादर्स डे’. असं नवाजने व्हिडीओमध्ये म्हंटल आहे.

दरम्यान,या व्हिडीओखाली एक पोस्ट देखील करण्यात आली आहे. ‘पापा कहते है बडा नाम करेगा, गणेश हमारा ऐसा काम करेगा’. अशी पोस्ट नवाजुद्दीन सिद्दीकीने शेअर केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.