मुंबई – नवाजुद्दीन सिद्दीकीचे “रात अकेली है’ आणि “सिरीयस मॅन’ हे दोन शो अलीकडेच ओटीटी प्लॅटफॉर्मवर चांगलेच गाजले. त्याच्या कामाचे खूप कौतुकदेखील झाले होते. याच सुमारास नवाजुद्दीनच्या आणखीन एका प्रोजेक्टची घोषणा करण्यात आली होती.
“मुन्ना मायकेल’ नंतर नवाजुद्दीन सिद्दीकी पुन्हा एकदा डायरेक्टर शब्बीर खानबरोबर मिळून एक कॉमेडी करणार असल्याचे समजले आहे. नवाजुद्दीनच्या या नव्या कॉमेडी सिनेमाचे नाव “अद्भुत’ असे असणार आहे.
यापूर्वीही नवाजुद्दीनने अनेक सिनेमांमधून हलकी फुलकी कॉमेडी केली आहे. आतापर्यंत नवाजुद्दीन सिद्दीकाला मल्टिस्टार सिनेमांमध्ये किंवा व्हिलनचा रोल मिळाला आहे. मात्र, आता त्याच्या वाट्याला फुलफ्लेज कॉमेडी सिनेमा आला आहे.
शब्बीर खान सध्या “हिरोपंती 2′ आणि “बागी’ची स्क्रिप्ट लिहिण्यात व्यस्त आहे. हे काम संपल्यानंतर शब्बीर खान “अद्भुत’ची स्क्रिप्ट लिहिणार असल्याचे समजले आहे.
सध्या नवाजुद्दीनकडे “बोले चुडीया’, “जोगिया सारा रा रा’, “संगीन’ आणि “हिरोपंती 2′ सारखे अनेक सिनेमे आहेत. आता प्रोड्युसर मिळाल्यावर नवाजुद्दीन आणि शब्बीर खानच्या “अद्भुत’ची अधिकृत घोषणा केली जाईल.