मुंबई – अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा हिंदी चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज अभिनेता आहे. नवाजुद्दीनने बॉलीवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत आणि अनेक पुरस्कार जिंकले आहेत. अभिनेत्याला मिळालेल्या पुरस्कारांची यादी खूप मोठी आहे, आता या यादीत आणखी एका नावाची भर पडली आहे आणि ते म्हणजे आंतरराष्ट्रीय पुरस्कार. जे फ्रेंच रिव्हिएरा फिल्म फेस्टिव्हलमध्ये अभिनेत्याला मिळाले. एमी पुरस्कार विजेते अमेरिकन अभिनेता व्हिन्सेंट डी पॉल यांच्या हस्ते त्यास हा पुरस्कार देण्यात आला आहे.
नवाजुद्दीन सिद्दीकीला हा पुरस्कार मिळाला आहे ही देशासाठी अभिमानाची बाब आहे. मात्र, या अभिनेत्याला आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांना अनेकदा हा सन्मान मिळाला आहे. ‘फ्रेंच रिव्हिएरा फिल्म फेस्टिव्हल’मध्ये सहभागी होत असताना, नवाजुद्दीनने जगभरातील कलाकारांचे मन जिंकून घेतली आहेत. एका फोटोमध्ये नवाजुद्दीन प्रसिद्ध तुर्की अभिनेता कान्सेल एलसिनला मिठी मारताना दिसत आहे.