नवाजुद्दीन सिद्दिकी आणि तमन्ना भाटीया करणार रोमान्स

आपल्या अदाकारीने आण्इ डायलॉग डिलिव्हरीने अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी कायमच प्रेक्षकांची मने जिंकत आला आहे. नवाज ज्या ज्या चित्रपटांमध्ये काम करतो, तिथे आपल्या अभिनयाची छाप पाडतो. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सेक्रेड गेम्स सिझन 2 मध्येही नवाजुद्दीन सिद्दीकीने आपल्या सक्षम अभिनयाचा दाखला दिला. अनेकांनी या वेबसीरिजमधील त्याच्या अभिनयाची प्रशंसा केली. नवाजुद्दीन सिद्दीकीचा बोले चुडिया हा नवा चित्रपट लवकरच प्रदर्शित होतो आहे. या चित्रपटात ते अभिनेत्री तमन्ना भाटिया सोबत दिसणार आहेत.

विशेष म्हणजे बोले चुडिया या चित्रपटात कोणताही ऍक्‍शन सीन नसणार किंवा वाद-विवाद पण नसणार आहेत. हा केवळ एक रोमॅंटिक चित्रपट आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी आपल्या सोशल मीडिया हॅंडलवरून एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. या व्हिडिओमध्ये ते तमन्ना भाटिया हिच्यासोबत रोमान्स करताना दिसताहेत.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना नवाजुद्दीन सिद्दीकीने लिहिले आहे की, आता आपल्याला आयुष्यात कोणतही लफडं नकोय. फक्त रोमान्स आणि फॅमिली हवी. या माध्यमातून मी तुमच्याशी बोले चुडिया चित्रपटाची एक झलक शेअर करतोय. तुम्हाला ती नक्की आवडेल, अशी आशा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.