2014 मध्ये आलेल्या “हिरोपंती’तून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या टायगर श्रॉफच्या चित्रपटाविषयी एक नवीन अपडेट समोर आले आहे. हिरोपंती-2 चा सिक्वल आता येते आहे.
हिरोपंती-2 मध्ये व्हिलन म्हणून नवाजुद्दीन सिद्दीकी दिसणार आहे. यापूर्वीही दोघांनी एकत्र काम केले आहे. दोघांनीही ‘मुन्ना मायकेल’ चित्रपटात एकत्र काम केले आहे. हिरोपंती-2 ची घोषणा मागील वर्षी करण्यात आली होती.
त्याचे पहिले शेड्युल करोनाच्या दुसऱ्या लाटेपूर्वी पूर्ण झाले. मात्र, करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे त्याचे पुढील शुटिंग अर्धवट राहिले होते. महाराष्ट्रात आता लॉकडाऊनचे निर्बंध हटवल्यानंतर चित्रपटाचे शूटिंग पुन्हा सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.
2014 मध्ये रिलीज झालेल्या हिरोपंतीच्या पहिल्या भागात टायगर श्रॉफसोबत कृती सॅनन होती आणि आता सिक्वेलमध्ये तारा सुतारिया त्याच्यासोबत दिसणार आहे.
हा चित्रपट 16 जुलै 2021 रोजी रिलीज केला जाणार होता. पण आता हिरोपंती-2′ यावर्षी 3 डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होईल, असे टायगर श्रॉफ वाढदिवसाच्या निमित्ताने म्हणाला आहे.
टायगर श्रॉफ शेवटी बागी 3 मध्ये दिसला होता. आता तो ‘हिरोपंती 2’ शिवाय ‘बागी 4’ आणि ‘रॅम्बो’ सारख्या चित्रपटांमध्ये काम करताना दिसणार आहे.