नवाजुद्दीन आणि राधिका आपटेच्या “रात अकेली है’चे शुटिंग पूर्ण

नवाजुद्दीन सिद्दीकी आणि राधिका आपटे या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनी खूप पसंत केले होते. दोघेही ऍक्‍टिंगमधील खिलाडी मानले जात आहेत. राधिका सौंदर्याने तर नवाजुद्दीन त्याच्या ऍक्‍टिंग स्कीलने प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनला आहे. अलिकडेच बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिकेमुळे त्याच्या नावाची क्रेझ आणखी वाढली आहे. त्या पाठोपाठ “फोटोग्राफ’मुळेही त्याच्या नावाचे वजन वाढले आहे.

यापूर्वीही श्रीराम राघवनचा थ्रिलर “बदलापूर’ आणि “मांझी; द माऊंटनमॅन’मुळे त्याच्याकडील क्षमता किती अफाट आहे, याची प्रचिती आली आणि त्याच्याकडून अपेक्षाही वाढल्या आहेत. नवाजुद्दीन सिद्दीकीच्या “रात अकेली है’चे शुटिंग पूर्ण झाले आहे. नवाजुद्दीनने इन्स्टाग्रामवर या सिनेमाच्या काही फोटो शेअर करून याबाबतची माहिती दिली आहे.

हनी त्रेहान यांच्या दिग्दर्शनाचा हा पहिलाच सिनेमा आहे. हनी त्रेहाननी यापूर्वी “सात खून माफ’,”ओमकारा’ आणि “मकबूल’साठी असिस्टंट डायरेक्‍टर म्हणून काम केले आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे रात अकेली है”मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी यामध्ये राधिका आपटेबरोबर रोमान्स करताना दिसणार आहे. नवाजुद्दीनसाठी स्वतःची इमेज रोमॅंटिक हिरो म्हणून निर्माण करण्याची ही संधी आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.