चिथावणीखोर भाषणाबद्दल शरीफांच्या जावयाला अटक

चिथावणीखोर भाषण दिल्याचा आरोप

लाहोर: पाकिस्तानचे लष्करप्रमुख आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश यांच्याविरोधात चिथावणीखोर टिपणी केल्याने, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे जावई, निवृत्त कॅप्टन सफदर मोहम्मद यांना अटक करण्यात आली आहे. दि. 13 ऑक्‍टोबर रोजी एका सार्वजनिक कार्यक्रमात सफदर यांनी वरील उच्चपदस्थांबाबत चिथावणीखोर वक्तव्ये केल्याने त्यांना सोमवार दि. 21 रोजी रावी टोलनाक्‍याजवळ अटक केली आहे, असे लाहोर पोलिसांनी सांगितले आहे.

पाकिस्तान पिनल कोड 124-ए नुसार सफदर यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली असून, स्वत: एक माजी सैनिक असलेल्या आणि माजी पंतप्रधानांचे जावई असलेल्या कॅप्टन सफदर यांनी मोठा गुन्हा केला असून, अशा प्रकारे चिथावणीखोर वक्तव्या केल्याने या घटनात्मक पदांची जाहीर अवहेलना झाल्याचा आरोप पोलिसांनी ठेवला आहे. याप्रकरणी लाहोर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून, हा गुन्हा सिद्ध झाल्यास त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा होऊ शकते.

लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्याविरोधात सफद मोहम्मद म्हणाले होते की, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना सुरक्षित ठेवण्यासाठीच फक्त बाजवा काम करत असून, त्यांना देशाच्या सुरक्षेविषयी कसलेही देणेघेणे नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.