लाहोर – पाकिस्तान सरकारविरोधात मोर्चा काढल्याबद्दल माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या कन्या मरियम नवाज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यविरोधातील पाकिस्तान डेमोक्रॅटिक मुव्हमेंट या 11 पक्षांच्या आघाडीने 16 ऑक्टोबर रोजी लाहोरमध्ये मोर्चा काढला होता. मरियम यांनी त्या मोर्चाचे नेतृत्व केले होते. या मोर्चादरम्यान मरियम यांनी इम्रान खान यांना “भ्याड, (अप्रत्यक्ष) निवडलेले आणि लष्कराच्या मागे लपणारे बाहुले’ असे संबोधले होते.
आपली अयोग्यता लपवण्यासाठी इम्रान खान ल्ष्कराच्या आड लपत असल्याचा आरोप त्यांनी उघडपणे केला होता. आपल्याला तुरुंगात जण्याची भीती वाटत नसल्याने इम्रान खान यांनी आपल्याला अटक करून दाखवावे, असे आव्हानही मरियम यांनी दिले होते.
सरकारविरोधात घोषणाबाजी, नागरिकांना त्रास देणे, वाहतुकीस अडथळा निर्माण करणे, मायक्रोफोन आणि स्पीकरचा वापर करणे आणि करोना प्रतिबंधक उपाययोजनांचे उल्लंघन केल्याचे आरोप मरियम यांच्याविरोधातील “एफआयआर’मध्ये नमूद केले गेले आहेत.
या “एफआयआर’मध्ये मरियम यांचे पती कॅप्टन मोहम्मद सलदार यांचाही उल्लेख केला गेला आहे. सलदार यांना यापूर्वीच कराचीमध्ये कायदे-ए आझम (जिना) यांच्या कबरीची बेअदबी केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे.