नवाज शरीफ यांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला

इस्लामाबाद – भ्रष्टाचाराच्या आरोपावरून सध्या कारागृहात असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचा जामीन अर्ज कोर्टाने आज पुन्हा फेटाळला आहे. वैद्यकीय कारणास्तव त्यांनी जामीनासाठी अर्ज केला होता. शरीफ यांना भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली आहे. सध्या ते कोटलाखपत कारागृहात आहेत. त्यांनी इस्लामाबाद हायकोर्टात हा जामीन अर्ज केला होता.

आपली प्रकृती दिवसेंदिवस ढासळत असून वैद्यकीय उपचारासाठी आपल्याला जामीन मंजुर करावा अशी मागणी त्यांनी केली होती. पण न्यायालयाने त्यांचा हा अर्ज कोणतेही कारण न देता फेटाळून लावला. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाईल असे त्यांच्या वकिलांनी सांगितले. मध्यंतरी कारागृहात असताना शरीफ यांची प्रकृती अचानक ढासळली होती त्यामुळे त्यांना कारागृहात हलवण्यात आले होते. तथापी त्यांना कारागृहाच्या बाहेरील रूग्णालयात नेण्यास मनाई करण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)