नवाज शरीफ पुनरागमनाच्या तयारीत

इस्लामाबाद – पाकिस्तानचे पदच्युत झालेले माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पाकिस्तानच्या राजकारणात पुन्हा सक्रिय होण्याचे संकेत दिले आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात पाकिस्तानानातील सर्वच विरोधी पक्षांनी रविवारी आयोजित केलेल्या व्हर्च्युअल पत्रकार परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो यांनी नवाज शरीफ यांना निमंत्रित केले आहे.

नवाज शरीफ गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून सध्या लंडनमध्ये वास्तव्यास असून लाहोर उच्च न्यायालयाने त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. नवाज शरीफ यांना 2017 साली पंतप्रधानपदावरून हटवण्यात आले होते.

त्यानंतर शरीफ, त्यांची कन्या मरियम नवाज आणि जावई मुहंम्मद सलदार यांना अव्हेन्फिल्ड प्रॉपर्टी प्रकरणात 6 जुलै 2018 रोजी दोषी ठरवण्यात आले आहे. अल अझिझिया स्टील प्रकरणातही त्यांना 2018 साली 7 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.