लाहोर – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना पाकिस्तान सरकारने फरार घोषित केले आहे. नवाझ शरीफ सध्या लंडन येथे उपचार घेत असून त्यांच्या प्रत्यार्पणासाठी पाकिस्तानने ब्रिटन सरकारशी संपर्क साधला आहे.
शरीफ यांचा वैद्यकीय कारणास्तव चार आठवड्यांचा जामीन गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये संपला, असे उत्तरदायित्व व अंतर्गत बाबीसंबंधी पंतप्रधानांचे सल्लागार शहजाद अकबर म्हणाले.
करोनाच्या आजारामुळे तेथील डॉक्टरांनी आपल्याला बाहेर न जाण्याची सूचना केली असल्याचे शरीफ यांनी गेल्या महिन्यात लाहोरमधील एका न्यायालयात सांगितले आहे. शरीफ यांनी आपल्या वकीलामार्फत आपला वैद्यकीय अहवाल लाहोर उच्च न्यायालयात सादर केला आहे.शरीफ यांना उत्तरदायित्व कोर्टाने भ्रष्टाचाराच्या प्रकरणात शिक्षा सुनावली आहे.
शरीफ यांनी आपला मुलगा हसन नवाज याच्याबरोबर छत्री धरली असल्याचे सोशल मीडियावर एक नवीन फोटो शेअर करण्यात आले आहे. त्यानंतर शरीफ यांना फरार घोषित करण्यात आले आहे.