मुबंई : मुंबईच्या क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणाला फडणवीस-मलिक यांच्या आरोप प्रत्यारोपामुळे वेगळेच वळण मिळालेआहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख केला असून फडणवीसांनीही त्यांच्या आरोपांना उत्तर दिले आहे. दरम्यान नवाब मलिक यांनी ट्वीट केले असून आज पत्रकार परिषद घेणार असल्याचे सांगितले आहे.
उनकी नींद खो गई है,
अब चैन खोने का वक़्त आ गया है,
मिलते है आज सुबह १० बजे— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 10, 2021
नवाब मलिक यांनी ट्वीट करत देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे. “उनकी नींद खो गई है,अब चैन खोने का वक़्त आ गया है. मिलते है आज सुबह १० बजे”, असं नवाब मलिक यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांनी जमीन व्यवहाराबाबतचे केलेले सर्व आरोप फेटाळून लावले. जमिनीचा जो काही व्यवहार केला आहे, त्याची सर्व कागदपत्रे उपनिबंधक कार्यालयात उपलब्ध आहेत. जो काही व्यवहार झाला, त्याचे मुद्रांक शुल्क भरलेले आहे. फडणवीस खोटे बोलत आहेत, असे प्रत्युत्तर त्यांनी दिले.