नवी दिल्ली – हवाई दलानंतर आता नौदलालादेखील देशातील पहिली महिला पायलट मिळणार आहे. बिहारची शिवांगी स्वरूप ही देशातील पहिली नौदल पायलट बनणार आहे. तीने कोच्चीमध्ये प्रशिक्षण घेत आहे. तिला ४ डिसेंबर रोजी नौदल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बॅच लावण्यात येणार आहे.
नौदल कोच्चीच्या ऑपरेशन ड्यूटीमध्ये शिवांगी सहभागी होईल. ती फिक्स्ड विंग डोर्नियर सर्विलांस विमान उडवेल. हे विमान कमी अंतराच्या समुद्री मिशनसाठी पाठवले जाते. यामध्ये आधुनिक सर्विलांस, रडार, नेटवर्किंग आणि इलेक्ट्रॉनिक सेंसर आहेत. शिवांगीला मागील वर्षी जूनमध्ये व्हाइस एडमिरल एके चावला यांनी औपचारिकरित्या नौदलात सहभागी केले होते.
Sub Lieutenant Shivangi, Indian Navy: I have been craving for this since a very long time & finally it is here, so it’s a great feeling. I am looking forward to complete my 3rd stage of training. https://t.co/Qp2W05nnPF pic.twitter.com/24FUvwsK9m
— ANI (@ANI) December 2, 2019
शिवांगीने २०१० मध्ये डीएव्ही पब्लिक स्कूलमध्ये सीबीएसई दहावीची परिक्षा दिली. त्यानंतर तिने बारावी सायन्समधून दिल्यानंतर इंजिनिअरिंग केले. एसएसबी परिक्षेद्वारे तिची सबलेफ्टनेंट म्हणून निवड झाली. प्रशिक्षणानंतर तिची पहिली महिला पायलट म्हणून निवड करण्यात आली.