मुंबई – शारदीय नवरात्रोत्सवाच्या काळात आपण सर्वजण शक्तीस्वरूप दुर्गेची उपासना करतो. विविध व्रतवैकल्यांच्या माध्यमातून देवीच्या उपासनेत लीन होतो. आपल्या प्रत्येकाच्या आत एक आत्मशक्ती असून, ती ओळखण्याचा हा कालखंड आहे.
View this post on Instagram
दुर्गामातेला शक्तीचे आद्यपीठ मानले जाते आणि सर्व शक्तींचा स्रोतही. या शक्तीस्रोतामधून ऊर्जा ग्रहण करून स्वतःच्या अंतरंगात देवीचा अंश जागृत करणे हीच देवीची खरी उपासना आहे.
View this post on Instagram
या उपासनेसाठी मराठी कलाविश्वातील आघाडीच्या अभिनेत्रींनी एका अनोख्या स्वरूपात देवीची आराधना केली. अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने नवरात्रीच्या दिवसात कोल्हापूर नगरातील आणि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक श्री महालक्ष्मीचे रूप धारण केले आहे.
View this post on Instagram
सध्या अपूर्वाचे हे फोटो सोशल मीडियावर आकर्षण ठरत आहे. मी अणि माझ्या टीमने केलेला एक प्रामाणिक प्रयत्न, असं म्हणत अपूर्वाने नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.