जिल्ह्यात नवरात्रोत्सवाला उद्यापासून सुरुवात

विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन

सातारा – शक्तीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या दुर्गादेवीच्या उत्सवाला, म्हणजे शारदीय नवरात्रोत्सवाला उद्या, दि. 29 पासून सुरुवात होत आहे. यानिमित्त सातारा शहरातील विविध मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रम व सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांमार्फत सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.

अजिंक्‍यतारा किल्ल्यावर मंगळाई, देवी चौकातील कालिकादेवी, व भवानी पेठेतील पंचपाळे हौद दुर्गादेवी मंदिरात विविध कार्यक्रम होणार आहेत. देवीच्या अन्य मंदिरांवर विद्युत रोषणाईही करण्यात आली आहे. या मंदिरांमध्ये रविवारी सकाळी विधिवत घटस्थापना करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना संपन्नता लाभावी, महिलांना अन्यायाविरोधात लढण्याची शक्ती मिळावी यासाठी नऊ रात्री मंदिरांमध्ये देवीचा जागर होणार आहे. मंदिरांमध्ये नऊही दिवस भाविकांची गर्दी असते. खाद्यपदार्थांचे स्टॉल, फनफेअर, फनी गेम्सची तयारी सुरू झाली आहे. महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र दर्शन रांगांची व्यवस्था मंदिरांमध्ये करण्यात आली आहे. मंगळवार तळ्यावरील तुळजाभवानीच्या मंदिरातही लगबग सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.