Navratri Colors 2021 Day 1: नवरात्रीचा आज पहिला दिवस! पिवळ्या रंगाचे वस्त्रे करा परिधान

पुणे – नवरात्रोत्सव म्हटला की महिला वर्गात प्रचंड उत्साह असतो. कारण दांडीया, गरबा यासोबत नऊ रंगाचे कपडे घालण्याची महिला वर्गामध्ये उत्सुकता असते. नवविवाहिता, तरुणी या दिवसांमध्ये खास नटण्याथटण्यात गुंग असतात. नऊ दिवसांसाठी नऊ रंगांची वस्त्रे खरेदीसाठीही धावपळ होते. 

ड्रेसच्या कलर सोबत दागदागिने तसेच इतर वस्तूंच्या कलर मॅचिंगकडेही खास लक्ष दिले जाते. नऊ दिवसांच्या या उत्सवात प्रत्येक दिवशी एक रंग ठरलेला असतो. त्यानुसार साडी, वस्त्र परिधान केले जातात. सध्या हा ट्रेंड झाला आहे. नवरात्रसेत्सवात महिलांबरोबरच पुरुषांकडूनही चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो. 

नवरात्रीचा आजच्या पहिला दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत. आज नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते. आज मातेची पिवळ्या रंगाची वस्त्रे घालून पूजा करावी. पिवळा रंग तसा साडीत खुलून दिसतो. 

त्याचबरोबर तरुणी विविध प्रकारचे पिवळ्या रंगाचे ड्रेस परिधान करतात. राजस्थानसारख्या रंगीबेरंगी राज्यात तरुणींचे पिवळ्या रंगातील रूप नजरेत भरते. आपल्याकडेही पिवळ्या रंगातील साडीसोबतच विविध प्रकारचे ड्रेस तसेच मॅचिंग दागदागिने परिधान करण्यास प्राधान्य दिले जाते.

पिवळ्या रंगाचे विशेष – 

पिवळा रंग म्हणजे ओजस्विता, आनंद आणि उत्साह. नऊ दिवसांच्या या उत्सवाची सुरुवात अशा प्रकारे करणे हे फारच विलक्षण आहे. पिवळ्या वस्रामुळे सौंदर्यात अधिक भर पडते. पिवळ्या वस्रावर पडलेल्या प्रकाशामुळे चेहरा अधिक उजळलेला दिसतो. 

सावळ्या रंगावर पिवळा रंग शोभून दिसतो हे विशेष. पुरुषांसाठीही विविध प्रकारचे पिवळ्या रंगातील खास नवरात्रीसाठी असलेले पोशाख सहज उपलब्ध आहेत. त्यामुळे पुरुषांनीही पिवळ्या रंगात न्हावून निघावे.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.