बालगोपाळांनी दिली मृततळ्याला नवसंजीवनी

मसूर – दुष्काळाच्या राक्षसावर मात करण्यासाठी हणबरवाडी (मसूर) येथील सिद्धनाथ शेडगे या जिद्दी तरुणाने व बाल गोपाळांनी हाताचे पोलाद करून आणि छातीची ढाल करून दुष्काळाच्या राक्षसावर मात करण्याचा भीम पराक्रम केला आहे. गावाबाहेरील पश्‍चिमेला असलेल्या थारोबाच्या डोंगराच्या पठारावर हजारे लिटर पाणी साठवणाऱ्या मृत तळ्याला नवसंजीवनी दिली आहे. हजारो लिटर पाणी साठवण्याची क्षमता असलेले थारोबाच्या डोंगरावरील तळे अनेक वर्षापूर्वीसून मृत स्वरूपात होते. पहिल्या काळात या तळ्यावर वन्य प्राणी, पशु, पक्षी यांचे वास्तव असे त्याच बरोबर गावातील मेंढपाळ, गुरेढोरे व माणसांची तहान हे तळे भागवत असे. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने अनेक वर्षापासून हे तळे मृत होते.

या समाज कार्यासाठी चित्रपट दिग्दर्शक रामकुमार शेडगेंच्या मार्गदर्शनाखाली सिद्धनाथ शेडगे, अक्षय शेडगे, शिवशंभो तालीम हणबरवाडीचे बालगोपाळ यशराज दबडे, साहिल शेडगे, सुशांत शेडगे, शंभूराज शेडगे, प्रणय साळुंखे, आदित्य पवार, देवराज शेडगे, सुजल शेडगे, नैतिक शेडगे, विजय शेडगे, सिद्धेश शेडगे, विशाल पवार, रविराज शेडगे, सिद्धार्थ शिंदे, आयुष पंदुगडे, अक्षय निगडे, शिवराज लोहार, शुभम ढेरे, विशाल घाडगे, रामकुमार शेडगे आदींनी श्रमदान केले.

पाणी संकटावर मात करायची असेल तर पावसाचे पाणी वाहून जाऊ न देता ते आडवून जिरवले तरच भूगर्भात पाणीसाठा वाढेल आणि यातूनच पाणी संकटावर मात करता येईल. म्हणून प्रत्येकाने पाणी आडवून जिरवले पाहिजे आणि येत्या पावसाळ्यात “एक व्यक्ती एक झाड’ ही संकल्पना अमलात आणली पाहिजे.

रामकुमार शेडगे, दिग्दर्शक 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.