मुंबई – मागील अनेक दिवसांपासून शिवसेना आणि खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा दाम्पत्यांचे राजकीय जुगलबंदी सुरू आहे. नवनीत राणा यांनी केलेल्या हट्टामुळे या दाम्पत्याला कारागृहात देखील जावं लागलं. कारागृहातून बाहेर आल्यानंतर हा वाद मिटेल असा वाटलं होतं. मात्र दिल्लीत जावून नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. मात्र काल राणा दाम्पत्याचा शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासोबतचा फोटो व्हायरल झाला होता. त्यावर आता नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
खासदार संजय राऊत आणि राणा दाम्पत्याचा लडाख येथील फोटो समोर आल्यानंतर चर्चांना उधाण आलं होतं. केवळ दाखविण्यासाठी राजकीय टीका केल्या जातात का, अशी चर्चाही सुरू झाली होती. यावर आता नवनीत राणा म्हणाल्या की, महाराष्ट्राच्या संस्कृतीनुसार संजय राऊत यांची भेट घेतली, असा खुलासा नवनीत यांनी केला. तसंच, जेलमध्ये मी जे भोगलं त्यांना काय माहिती, असंही नवनीत राणा म्हणाल्या.
नवनीत राणा पुढं म्हणाल्या की, ‘मी जेव्हा लडाखला गेले, तेव्हा कळलं ही संजय राऊत सुद्धा तिथे आहे. ते तिथे आहे म्हणून मी गेले नसते तर माझ्या कामावर अन्याय झाला असता, म्हणून मी त्यांची भेट घेतली. महाराष्ट्राच्या संस्कृतीनुसार मी संजय राऊत यांच्या सोबत लेहमध्ये वागले, त्यांना जरी महाराष्ट्राची संस्कृती माहित नसेल पण मला माहित आहे. 14 दिवस मी तुरुंगात होते, तो त्रास मी भोगला असंही नवनीत राणा यांनी म्हटलं.