नगर – नवनागापूर ग्रामपंचायतींच्या हद्दीत असलेल्या विविध कारखान्यांकडील मालमत्ता कराची वाढती थकबाकी वसूल करण्यासाठी ग्रामपंचायतीने मालमत्ता जप्त करण्याची धडक मोहीम सुरू केली आहे. मंगळवारी सकाळी ही कारवाई सुरू झाली. नवनागापूर ग्रामपंचायती अंतर्गत 36 कारखान्यांकडे ग्रामपंचायतीची 1 कोटी 98 लाख 27 हजार 682 रुपयांचा मालमत्ताकर थकवला आहे.
त्यामुळे थेट कारखाने सील केले जात आहेत. गटविकास अधिकारी संजय केदारे, चंद्रकांत खाडे, टी. एन. तुपे, सरपंच सुशीला जगताप, बबनराव डोंगरे, आप्पासाहेब सप्रे, संजय भोर, ग्रामविकास अधिकारी संजय मिसाळ सह पोलीस बंदोबस्त ही कारवाई सुरू आहे. या कारवाईमुळे औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांच्या चालकांचे धाबे दणाणले आहे. वर्षानुवर्ष मालमत्ता कराची थकबाकी आहे. ही वसुली करण्यासाठी ग्रामपंचायतीने नोटिसा बजावल्या होत्या. पण या नोटिसांना देखील कारखानदारांनी जुमानले नाही.
त्यामुळे अखेर पंचायत समितीच्या सहकार्याने ग्रामपंचायतीने थकबाकी वसुल करण्यासाठी कारखान्यांची मालमत्ता जप्त करण्याची धडक मोहीम आजपासून सुरू केली.
थकबाकीदार पुढीलप्रमाणे आहेत. वीर अलाईज ऍन्ड स्टील के. प्रा.लि (1073577), नव महाराष्ट्र फ्लोअर मिल (1097458), बोथरा ऍग्रो इक्युप मेटस प्रा.लि (422823), अपेक्स एन कॉन प्रा.लि. (396489), सरस्वती दाल ऍण्ड बेसन (419576),ररूषा इंजि प्रा.लि. (600365), अहमदनगर अलाईज प्रा. लि (782149), शासकीय दूध योजना (24 31086), विश्व इलेक्ट्रॉनिक्स (1339804), बिकसन इंजिनिअरिंग वर्क्स (288719), पायोनियर वर्ल्ड (289063), सलू जा सोप्स इंडस्ट्रीज (262281), डोम बेल इलेक्ट्रॉनिक्स (1493711), व्हलक्न इंजि. (1114753) , चव्हाण ऍन्ड सन्स संजय टाईल्स (96491), काऊन कोटिंग ऍण्ड इंजी (301425), ओंकार फौंड्री ऍण्ड इंजिनिअरिंग (420876), सम्राट इंडस्ट्रीज (557876), सिध्दी प्रिसिजन कांम्पोनंट ऍण्ड ऍक्सेसरीज (608889), सिद्धी ऑटो मोटर्स प्रा. लि, (757387), क्लासिक व्हील प्राय.लि (2604316), गरवारे मरीन इंडस्ट्रीज (764704), क्लासिक व्हील प्रायव्हेज लि. (694610), जेमिनी सेल्स कॉपौरेशन (29306), इकोनॉमिक्स ट्रान्सपोर्ट ऑरगनायजेस (109125), एस. एम. ऑटोमोबाईल्स (110942), सुप्रिम रोडवेज (189723), राजू कम्युनिकेशन (70671), एम. पी. वेअर हाऊस (38565), ठिपसे ऍण्ड सन्स (52302), आर. आर. फास्ट नर्स (72541), बी. जी. डोंगरे कन्स्ट्रक्शन (32724), कांचन इंडस्ट्रीज (68054), वर्षा इंडस्ट्रीज (93270), भारत इलेक्ट्रो प्रॉडक्ट (66662), ए. एम. इलेक्ट्रॉनिक्स (75369 ).