पाटणा – माजी क्रिकेटपटू तथा काँग्रेस नेते नवजोत सिंग सिद्धू यांनी कटिहार लोकसभा मतदारसंघातील मुस्लिम मतदारांना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदावरून हटवण्यासाठी मोदींविरोधात एकगठ्ठा मतदान करण्याचे आवाहन आज केले होते. त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे नेते देवेश कुमार यांनी नवजोत सिंग सिद्धू यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. काँग्रेस नेते नवजोत सिंग सिद्धू यांनी कटिहार मधील आपल्या भाषणात जातीयतेच्या आधारावर मते मागितल्याचा आरोप या तक्रारीमध्ये बिहारच्या भाजप उपाध्यक्षांनी केला आहे.
Bihar BJP Vice-President Devesh Kumar: We met Election Commission and made them aware of Punjab Minister Navjot Singh Sidhu's statement made at a rally in Katihar, earlier today. They said they have seen the footage and have assured us that necessary action will be taken. pic.twitter.com/XF3l5aWkQb
— ANI (@ANI) April 16, 2019
दरम्यान, कटिहार लोकसभा मतदारसंघातील मुस्लिम मतदारांना संबोधित करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात मतदान करण्याचा सल्ला नवजोत सिंग सिद्धू यांनी दिला होता. मुस्लिम मतदारांना “तुम्ही अल्पसंख्यांक आहेत असा विचार करण्याची गरज नाही, कारण तुमची कटिहार लोकसभा मतदारसंघामधील संख्या ६२% आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी मोदींविरोधात एकगठ्ठा मतदान करून त्यांना पाडायला हवे.” असे नवजोत सिंग सिद्धू बोलताना म्हणाले होते.