The Great Indian Kapil Show | कपिल शर्माचा कॉमेडी शो नेहमीच चर्चेत राहिला आहे. यात नवज्योत सिंग सिद्धू देखील पाहायला मिळाले होते. त्यानंतर त्यांच्या जागी अर्चना पूरण सिंह दिसल्या. परंतु आता ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ मध्ये पुन्हा एकदा नवजोत सिंह सिद्धूची एन्ट्री होणार आहे. कपिलच्या शोमध्ये नवजोत सिंह सिद्धू यांची पत्नी नवजोत कौर सिद्धू या देखील हजेरी लावणार आहेत.
कपिल शर्माच्या कॉमेडी शोचा नवीन प्रोमो समोर आला आहे. ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या नवीन प्रोमोमध्ये समोरील खुर्चीवर अर्चना पूरन सिंहच्या ऐवजी नवजोत सिंह सिद्धू बसल्याचं दिसत आहे. शोचा नवीन प्रोमो समोर आला असून हा आता प्रचंड व्हायरल होत आहे.
यात दिसते की, ‘सुरुवातीला कपिल म्हणतो, मी काय म्हणत होतो… आणि मग तो नवज्योत सिंग सिद्धूला पाहतो आणि त्याला धक्का बसतो. मग नवज्योतसिंग सिद्धू कपिलला म्हणतात- नीट बघ, मी नवज्योत सिंग सिद्धू आहे. यानंतर अर्चना पूरण सिंह धावत येतात आणि कपिलला म्हणतात – सरदार साहेबांना माझ्या खुर्चीवरून उठायला सांग. माझ्या खुर्चीवर कब्जा करुन बसले आहेत.’
View this post on Instagram
यानंतर हरभजन सिंग शोमध्ये दिसत आहे. तो म्हणतात- जग काहीही म्हणो, कोणाच्या बोलण्याने कोणी मूर्ख बनत नाही, कोणी खुर्चीवर बसू शकत नाही पण कोणी सिद्धू बनत नाही. दरम्यान, कपिल शर्माच्या शोच्या नवीन प्रोमोमध्ये माजी क्रिकेटपटू हरभजन सिंह आणि त्याची पत्नीही दिसत आहे. यावेळी नवज्योत सिंग सिद्धूने हरभजनला मिठी मारताना दिसतात.
दरम्यान, शोच्या प्रोमोवरुन आगामी एपिसोडमध्ये नवजोत सिंह सिद्धू परतणार असल्याने शोमध्ये खुर्चीवरून रस्सीखेच सुरू असल्याचे पहायला मिळणार आहे.
हेही वाचा: