#AirStrike : भारतीय वायु दलाच्या कामगिरीनंतर नवजोत सिहं सिध्दू यांची प्रतिक्रिया

नवी दिल्ली – भारतीय वायु दलाच्या मिराज – 2000 या विमानांनी आज पहाटे 3 वाजून 30 मिनिटांनी पाक व्याप्त काश्मीरमध्ये प्रवेश करत दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केलं. यामध्ये 200 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा केला. यानंतर काँग्रेस नेता आणि माजी क्रिकेटपटू नवजोत सिंह सिध्दू यांनी भारतीय वायु सेनेच्या या कामगिरीच कौतुक करत ट्विट केले आहे.

नवजोत सिंह सिध्दू ने ट्विट केले आहे की, “लोहा लोहे को काटता है, आग आग को काटती है,सांप जब डंक मारता है, उसका एंटीडोट विष ही है,आतंकियों का विनाश अनिवार्य है” | भारतीय वायु सेना की जय हो.  जय हिन्द,  जय हिन्द की सेना.

इतकच नाही तर नवजोत सिंह सिध्दूने भारतीय वायु सेनेने दहशतवादी तळांवर केलेल्या कारवाईवर दोन ट्विट केले आहेत. सिध्दू यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘खऱ्या खोट्याच्या लढाईत तुम्ही तटस्थ राहण्याची जोखिम घेऊ शकत नाही, दहशतवादी संघटनाविरूध्द युध्द सुरू झाले आहे’… शाब्बास भारतीय वायु सेन…जय हिंद.

Leave A Reply

Your email address will not be published.