पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या लाटेसमोर सत्ताधारी काँग्रेसचा सुपडा साफ होताना दिसून येत आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी आपला पराभव स्वीकारला आहे. पंजाबच्या जनतेने घेतलेला निर्णय मान्य असल्याचे नवज्योतसिंग सिद्धू यांनी म्हटले आहे. दरम्यान त्यांनी आम आदमी पक्षाचेही विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
नवज्योतसिंग सिद्धू यांनी ट्विट केले आहे यामध्ये, “लोकांचा आवाज हा देवाचा आवाज आहे. आम्ही आमचा पराभव मान्य करतो. पंजाबच्या जनतेच्या निर्णयाचा आदर करतो. विजयाबद्दल आम आदमी पक्षाचे अभिनंदन.”
पंजाबच्या इतिहासात पहिल्यांदाच आम आदमी पार्टी 90 जागा जिंकताना दिसत आहे. काँग्रेस पक्ष आतापर्यंत 17 जागांवर आघाडीवर आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेस पक्षाला 60 जागांचे नुकसान होताना दिसून आले आहे.