नवज्योत सिंग सिध्दूची ‘द कपिल शर्मा शो’मधून हकालपट्टी नाही : कपिल शर्मा

नवी दिल्ली – जम्मू-काश्‍मीर येथील पुलवामातील दहशतवादी हल्ल्याबद्‌दल केलेल्या विधानामुळे वादात सापडलेले कॉंग्रेस नेते नवज्योत सिंग सिध्दू यांना ‘द कपिल शर्मा शो’मधून काढून टाकण्यात आल्याची चर्चा सोशल माध्यमांमध्ये रंगली होती. #BoycottSidhu, #Boycottkapilsharmashow असे हॅशटॅग ट्विटवर दोन दिवसांपूर्वी ट्रेंड होत होते मात्र कपिल शर्मा शो’मधूनही काढून टाकण्यात आल्याची चर्चावर पूर्ण विराम लावला आहे. त्यांनी एका नामांकित वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये नवज्योत सिंग सिद्धूची बाजू मांडली आहे.

कपिल शर्माने या सर्व विषयावर आपले मत सांगितले आहे कि. ”गेल्या काही दिवसांपासून #BoycottSidhu, #Boycottkapilsharmashow असे हॅशटॅग ट्विटवर ट्रेंड होत अशा विषयांना आपल्याकडे तरुणांना भरकटवण्याचे पुढे आणले जातात. अशा विषयांना आपण किती महत्व द्यावे हे आपण स्वतः हा ठरवावे. आणि  मला वाटतं आपण नेमकी समस्या काय आहे, त्यावर उपाय कसा शोधता येईल याचा विचार करायला पाहिजे.’ तसेच नवज्योत सिंग सिद्धू यांना शोमधून काढण्यात आले नसल्याचे त्याने सांगितले, ‘सिद्धू सध्या त्यांच्या काही खासगी कामांमध्ये व्यग्र असल्याने ते शोमध्ये काही एपिसोड्स दिसणार नाहीत.’ असे ही तो म्हणाला.

Leave A Reply

Your email address will not be published.