कायदा, सुव्यवस्थेसाठी वडगाव निंबाळकर पोलिसांचे पथसंचलन

सोमेश्वरनगर: वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याच्या वतीने दि २१ रोजी पार पडणाऱ्या निवडणुका दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सोमेश्वरनगर, करंजेपुल आणि वाणेवाडी येथे सोमवारी सशस्त्र पोलिसांचे पथसंचलन करण्यात आले.

करंजेपुल येथील मुख्य चौक ते सोमेश्वर कारखाना, दुकानलाईन ते वानेवाडी ते पोलिस चौकी असे पथसंचलन पार पडले. २१ तारखेला तारखेला राज्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडत आहेत, त्यानंतर लगेचच मतमोजणी आणि दिवाळी सण होणार आहे.

यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आज कारंजेपुल, सोमेश्वरनगर आणि वानेवाडी या गावांमधून पोलिसांनी पथसंचालन केले, वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे संचालन पार पडले. ओरिसा येथील इंडियन रिझर्व्ह बटालियनचे ६३ जवान वडगाव निंबाळकरचे १५ पोलीस आणि ३ अधिकारी या संचालनामध्ये सहभागी होते.

यानंतर दिवाळी या सणाची तयारी सुरु असून सर्व सण उत्साहात आणि शांततेत साजरे व्हावेत यासाठी पोलिस प्रयत्न करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर जातीय सलोखा राखला जावा आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याच्या वतीने आतापर्यंत सोमेश्वरनगर, वानेवाडी, करंजेपुल, वडगाव, पणदरे येथे संचलन करण्यात आले असून यानंतर काऱ्हाटी सुपे येथे हे संचलन करण्यात येणार असल्याची माहिती वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.