नारायणगाव हद्दीतील 19 गावांत पथसंचलन

नारायणगाव- विधानसभा निवडणुका काळात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी नारायणगाव पोलिसांनी हद्दीतील 19 गावांमध्ये पथ संचलन केले.

सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नारायणगाव, आर्वी, पिंपळगाव, येडगाव, वडगाव कांदळी, बोरी, शिरोली सुलतानपुर, निमगाव सावा, पारगाव, खोडद, मांजरवाडी या गावात निवडणुका शांततेत आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी महत्त्वाच्या भागांमध्ये व गर्दीच्या रस्त्यावर ठिकाणी पोलीस जवान स्टाफ व सीआयएसएफ फोर्ससोबत संचलन करण्यात आले. यामध्ये 3 अधिकारी, 25 पोलीस, 10 होमगार्ड, सीआयएसएफ फोर्सचे 50 जवान, 10 पोलीस पाटील सहभागी झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.