काचा फोडून 30 ते 35 हजार रुपयांचे नुकसान
पिंपरी – जुनी सांगवी येथे दुचाकीवरुन आलेल्या टोळक्यांनी रस्त्यावर लावलेल्या वाहनांवर दगड मारुन काचांची तोडफोड करत दहशत माजविल्याची घटना घडली आहे. टोळक्यांनी रस्त्यावर उभ्या केलेल्या आठ वाहनांचे काचा फोडून नुकसान केले आहे. ही घटना आज मंगळवार दि. 2 जून रोजी पहाटेच्या सुमारास घडली.
याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती. टोळक्यांनी दगड मारुन वाहनांचे 30 ते 35 हजार रुपयाचे नुकसान केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
नवी सांगवी येथील हॉटेल मल्हार, मिरॅकल गार्डन समोर मंगळवारी पहाटे अडीच ते तीन वाजताच्या सुमारास मोपेड दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात तीन जणांनी रस्त्यावर लावलेल्या चारचाकी वाहनांवर दगड मारुन नुकसान केले. या दगडफेकीमध्ये रस्त्यावर लावलेल्या प्रवासी, मालवाहू आणि खासगी चार चाकी वाहनांचे नुकसान झाले आहे.