नवी मुंबई – राज्यात कोणत्याही महापालिकेच्या शाळांमध्ये सीबीएसई बोर्डाचा अभ्यासक्रम का नसतो, असा प्रश्न विचारित नवी मुंबई महानगरपालिकेने कुकशेत-नेरुळ येथे ज्युनियर कॉलेज व सारसोळे येथे सीबीएसई बोर्डाची शाळा सुरु करावी, अशी मागणी नगरसेवक सुरज पाटील यांनी आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी आमदार गणेश नाईक उपस्थित होते.
महापालिका क्षेत्रातील नेरुळ विभागात कुमशेत आणि सरसोळे ही गवे येतात. याविभागात राहणारे लोक हे बहुतांश गरीब, अल्प व माध्यम उत्पन्न गटातील आहेत. त्यांची मुले येथील महानगरपालिकेच्या शाळेतच शिकतात. नवी मुंबई महापालिकेने आधुनिक शिक्षणाची कास धरत नवी मुंबई मनपाच्या अनेक शाळांमध्ये सीबीएसई बोर्डाच्या शाळा सुरु करून सामान्य कुटुंबातील मुलांना स्पर्धेचा मार्ग उपलब्ध करून दिला. हेच धोरण अन्य महापालिका शाळांमध्ये राबवले जावे. त्याच प्रमाणे सरसोळे व कुकशेतीमध्ये पालिकेने सीबीएसई बोर्डाची शाळा सुरु करावी, अशी मागणी सुरज पाटील यांनी केली आहे.
सर्वसामान्यांच्या मुलांना इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळावे, म्हणून महापालिका सभागृहात वेळोवेळी योग्य बाजु मांडून व पाठपुरावा करुन कुकशेत गावात पहिली इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु करण्यात सुरज पाटील यांनी यश प्राप्त केले. त्या सकारात्मक निर्णयामुळे सध्या गोरगरीब विद्यार्थी त्या ठिकाणी हक्काचे शिक्षण घेत आहेत.
या विद्यार्थी वर्गाला शाळेय साहित्य वेळेवर देणे, आवश्यक शिक्षक संख्या पुरविणे या गोष्टीबाबत मागणी करत असतांनाच भविष्यात कुकशेतच्या या विद्यामंदीराचे रुपांतर ज्युनियर कॉलेजमधे करण्यात यावे, ही मागणी सुरज पाटील यांनी केली केली आहे. तसेच सारसोळे शाळा हे नेरुळ फेज दोन व तीनचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने या शाळेत सीबीएई बोर्डाची शाळा सुरु करण्याची मागणी मनपा आयुक्त अभिजीत बांगर व ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांच्या समवेत आयोजित बैठकीत नगरसेवक सुरज पाटील यांनी केली.