आशापुरा माता मंदिरात नवरात्र महोत्सव

नवचंडी महायज्ञ : विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

बिबवेवाडी – पुणे शहरासह राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गंगाधाम- शत्रुंजय मंदिर रस्त्यावरील आशापुरा माता मंदिरात नवरात्रीनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन आशापुरा माता ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

नवरात्री निमित्त ट्रस्टच्या वतीने 29 रोजीपासून रोज सकाळी 7 ते 12 पर्यंत अभिषेक, दुपारी 4 ते 7 नवचंडी महायज्ञ. जो फक्त महाराष्ट्रात तुळजापूर नंतर या मंदिरात केला जातो. संध्याकाळी 7.30 वा. महाआरती, तसेच रात्री 9.30 वा. शयन आरती होणार आहे.

दररोज संध्याकाळी 7.30 वा. नामवंत संगीतकारांची “माता की चौकी’ या विशेष भक्ती संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या नवरात्र महोत्सवात 4 रोजी सकाळी 7.30 ला दोन हजार विद्यार्थ्यांचे सुक्त पठण होणार आहे, 5 रोजी सायंकाळी 7.30 वा नवदुर्गा पुरस्कार व समाजातील 9 विशेष पदावर काम करणाऱ्या महिलांच्या हस्ते महाआरती होणार आहे. 6 रोजी कन्या पूजन होणार आहे, अशी माहिती मंदिराचे प्रमुख विजय भंडारी यांनी दिली. या सर्व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विमल भंडारी, विजय भंडारी, चेतन भंडारी, अनिल गेलडा, अशोक भंडारी, गौतम गेलडा, शशिकांत भंडारी, मंगेश कटारिया, बाळासाहेब बोरा, पंकज कर्नावट, हितेश लोढा, शाम खंडेलवाल, दिलीप मुनोत, राजेंद्र कोठारी, राजेंद्र सोनी यांच्यासह ट्रस्टचे सर्व पदाधिकारी प्रयत्न करीत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.