अमरावती : आंध्र प्रदेश पोलिसांनी शुक्रवारी पाकिस्तानशी संबंधित हेरगिरीचे रॅकेट उद्ध्वस्त केले. भारतीय नौदलाच्या सात कर्मचाऱ्यांना अटक केली, असे आंध प्रदेश पोलिसांनी शुक्रवारी सांगितले.
याबाबात प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल केला असून सात नौदल कर्मचारी आणि एका हवाला ऑपरेटर यांना देशातील विविध ठिकाणांहून ताब्यात घेण्यात आले आहे. आणखी काही संशयितांची चौकशी सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी ऑपरेशन डॉल्फीन नोज या नावाने ही मोहीम राबवली. पोलिसांचा गुप्तचर विभागाने केंद्रीय गुप्तचर विभागाच्या सहकार्याने ही मोहीम राबवली. नौदल गुप्तचर खात्याने मोहीम आखून हेरगिरीचे हे रॅकेट उघड केले.
(याबाबत आणखी तपशील मिळण्याची शक्यता आहे. तो मिळताच लवकरच सविस्तर वृत्त.)