नौदलातील अधिकारी शिकल्या होत्या पुण्यात

पुणे – नौदलाच्या लढाऊ जहाजांवर हेलिकॉप्टर चालकांच्या पथकात नुकतीच महिला अधिकाऱ्यांची नियुक्‍ती करण्यात आली. यामध्ये पुण्यात शिक्षण घेतलेल्या सबलेफ्टनंट रिती सिंह यांचादेखील समावेश आहे. यामुळे पुण्याच्या मानाचा तुरा रोवला गेला आहे. जहाजांवर तैनात होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी आहेत.

रिती सिंह यांनी सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नोलॉजीच्या (एसआयटी) 2013 ते 2017 या शैक्षणिक वर्षातील “संगणक विज्ञान अभियांत्रिकी’ बॅचच्या माजी विद्यार्थिनी आहेत. 2017 मध्ये एसआयटीमधून अभियांत्रिकी पदवी अभ्यास पूर्ण केल्यानंतर सैन्यात भरती झाल्या. सिंह या एक अष्टपैलू विद्यार्थिनी राहिल्या आहेत. शैक्षणिक आणि अभ्यासेतर उपक्रमांमध्ये त्यांचा कायम सहभाग असायचा.

दृढनिश्‍चय आणि कठोर परिश्रम या त्यांच्यातील गुणांमुळेच त्या यशाचे शिखर गाठू शकल्या. सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाला त्यांच्या कामगिरीबाबत अभिमान असल्याची प्रतिक्रिया संस्थेच्या वतीने देण्यात आली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.