नौदल प्रमुख ऍडमिरल सुनील लांबा थायलंडच्या दौऱ्यावर जाणार

नवी दिल्ली – नौदल प्रमुख ऍडमिरल सुनील लांबा 17 ते 19 एप्रिलदरम्यान थायलंडला भेट देणार आहेत. भारत आणि थायलंड मधले सागरी द्विपक्षीय संबंध दृढ करण्याबरोबरच वृद्धींगत करणे आणि संरक्षण सहकार्यासाठी नव्या संधींचा शोध घेणे हा या भेटीचा उद्देश आहे. या भेटीदरम्यान डमिरल सुनील लांबा, थायलंडच्या संरक्षण दलाचे प्रमुख जनरल पी बेनयासरी, रॉयल थाई नौदलाचे कमांडर इन चीफ लियुचाई रुद्दित आणि वरीष्ठ सरकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.

रॉयल थाई नौदल आणि रॉयल थाई सशस्त्र दलाच्या बॅंकाक इथल्या मुख्यालयाला आणि फुकेतमधल्या तिसऱ्या नौदल एरिया कमांडलाही ते भेट देतील. भारत आणि थायलंड यांच्यात अनेक शतकांपासून ऐतिहासिक संबंध आहेत. उभय देशांदरम्यान 1947 मधे औपचारिक राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.