पुणे – विद्युतरोषणाईसाठी प्रसिद्ध असणाऱ्या नातुबाग मंडळाच्या गणरायाची प्राणप्रतिष्ठा मंदिरातच करण्यात येणार आहे.
यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याच्या निर्णय मंडळांनी घेतला आहे. दरवर्षी बाजीराव रस्त्यावर भव्य मंडप उभारून गणेशोत्सव साजरा करण्यात येतो.
उत्सवाची मागील 78 वर्षांची परंपरा यंदा पहिल्यांदाच खंडित होणार आहे. मात्र, यंदा सामाजिक भान राखत मंडळाने हा निर्णय घेतला असून, गणेशोत्सवाच्या काळात आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात येणार असल्याचे मंडळाच्या वतीने अध्यक्ष प्रमोद कोंढरे यांनी जाहीर केले.