मुंबई – छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ने आजपर्यंत प्रेक्षकांची चांगलीच मने जिंकली आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. जेठालाल, टप्पूसेना, डॉ. हाथी, पोपटलाल आणि मराठमोळा एकमेव सेक्रेटरी भिडे हे सर्वच पात्र गेले अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.
दरम्यान, तारक मेहता मालिकेतील आणखील एक लोकप्रिय पात्र नट्टू काका यांची प्रकृती काही दिवसांपूर्वी बिघडली होती. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीने या बद्दल माहिती दिली होती. नट्टू काका म्हणजेच जेष्ठ अभिनेते ‘घनश्याम नायक’ यांना घशाचा त्रास होऊ लागला होता. त्यामुळे त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात होते.
मात्र, आता नट्टू काकांवर शस्त्रक्रिया झाली असून, ते पूर्ण बरे झाले आहेत. त्यामुळे लवकरच नट्टू काका आपल्याला हसवण्यासाठी ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मध्ये कमबॅक करतील. घनश्याम नायक गेल्या 10 वर्षांपासून तारक मेहतामध्ये नट्टू काकांची भूमिका निभावत आहेत. सध्या मालिकेची संपूर्ण टीम आपल्या लाडक्या नट्टू काकांच्या कमबॅकची वाट बघत आहे.
घनश्याम नायक यांनी तेरे नाम, घातक, चायना गेट, बरसात, आंदोलन, खाकी, शिकारी, क्रांतिवीर, तिरंगा, हम दिल दे चुके सनम अशा अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये झळकले आहेत. हिंदीसोबतच गुजराती इंडस्ट्रीमध्ये घनश्याम नायक यांनी नाव कमवलं आहे.