बारामती – नटराज नाट्य कला मंडळ, बारामती यांच्या वतीने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सालाबादप्रमाणे यावर्षी देखील राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी दि.१२ डिसेंबर २०२० रोजी बारामती येथे आयोजित करण्यात
आल्या आहेत.
संस्थेच्या वतीने गेली ३४ वर्षे सातत्याने एकांकिका स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. यावर्षी स्पर्धेचे हे सलग ३५ वे वर्ष आहे. यावर्षीच्या स्पर्धेत प्रथम क्रमांकास १०००१ रूपयांचे पारितोषिक व नटराज स्मृतीचिन्ह दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकास अनुक्रमे ७००१, ५००१ रूपये रोख रकमेची पारितोषिके व स्मृतीचिन्हे देण्यात येणार आहेत.
उत्तेजनार्थ एकांकिका सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, नेपथ्य, रंगभूषा, वेशभूषा, प्रकाश योजना, अभिनय-स्त्री, पुरुष, बालकलाकार, नवीन लेखन याकरिताही स्वतंत्र पारितोषिके दिली जाणार आहेत.
प्रवेश अर्ज पाठविण्याची अंतिम मुदत ९ डिसेंबर असून प्रवेश अर्ज व अधिक माहितीकरीता संस्थेचे अध्यक्ष किरण गुजर यांच्याशी 7020201411, 8421380038 या क्रमांकावर संपर्क साधावा ,असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.