देशी गर्ल अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्राने बॉलीवूडपासून हॉलीवूडपर्यत आपली स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. ती सोशल मीडियावरही खूप ऍक्टिव असते आणि तिची भली मोठी फॉलोंईग लाइन आहे. प्रियांकाने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे.
View this post on Instagram
या व्हिडिओमध्ये प्रियांका आपला नवरा निक जोनास याच्यासोबत दिसत आहे. यात प्रियांका सांगते की, ती लवकरच आगामी 93व्या ऑस्कर पुरस्काराच्या नॉमिनेशन्सची घोषणा करणार आहे. प्रियांका आणि निक हे 15 मार्चला 93व्या अकादमी पुरस्कारांचे नामांकन जाहीर करणार आहेत.
View this post on Instagram
हा व्हिडिओ शेअर करत प्रियांकाने कॅप्शनमध्ये लिहिले की, हॅलो ऍकॅडमी, अशी काही शक्यता आहे का, मी एकटीच ऑस्करचे नॉमिनेशन्स जाहीर करू शकेन. मी थोडीसी थट्टा केली. निक जोनासवर मी खूप प्रेम करते. आम्ही दोघेही 15 मार्चला ऑस्कर नॉमिनेशन्स जाहीर करण्यासाठी उत्साहित आहे.
View this post on Instagram
दरम्यान, ऑस्कर पुरस्कार वितरण सोहळा 28 फेब्रुवारीला आयोजित करण्यात आला होता. परंतु करोना महामारीमुळे तो लांबणीवर टाकत 25 एप्रिल रोजी आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
View this post on Instagram