बर्लिन – स्पेनने नेशन्स लीग फुटबॉल स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात बलाढ्य जर्मनीचा 6-0 असा दणदणीत पराभव केला व थाटात उपांत्य फेरी गाठली. गेल्या 89 वर्षांतील जर्मनीचा हा सर्वात दारूण पराभव ठरला.
फेरान टोरेस याने नोंदवलेली हॅट्ट्रिक या सामन्यातील महत्वाची गोष्ट ठरली. त्याने 33, 55 व 71 व्या मिनिटांना गोल केले. जर्मनीला 1931 साली ऑस्ट्रियाकडून मैत्रीपूर्ण सामन्यात 0-6 असा पराभव पत्करावा लागला होता.
स्पर्धेतील अन्य सामन्यांत फ्रान्सने स्वीडनचा 4-2 तर, पोर्तुगालने क्रोएशियाचा 3-2 असा पराभव केला. विश्वकरंडक फुटबॉल पात्रता फेरीच्या दक्षिण अमेरिकन गटात इक्वेडोरने कोलंबियाचा 6-1 असा पराभव केला.