नवी दिल्ली – इटलीने नेशन्स लीग फुुटबाॅल स्पर्धेतील उपांत्यूपूर्व फेरीच्या सामन्यात बोस्निया-हर्जेगोविनाचा 2-0 असा पराभव करत ग्रुप एक मध्ये अव्वलस्थान पटकावत स्पर्धेची उपांत्यफेरी गाठली. इटलीकडून आंद्रिया बेलोटीने 22 व्या तर डोमेनिको बेरार्डीने 68 व्या मिनिटाला गोल केला.
स्पर्धेतील अन्य सामन्यांत बेल्जियमने रोमेलू लुकाकु याच्या दोन गोलच्या जोरावर डेन्मार्कचा 4-2 असा पराभव करत अंतिम चारमध्ये जागा मिळवित उपांत्य फेरी गाठली. रोमेलूने 57 आणि 69 व्या मिनिटाला असे दोन गोल केले. दुसरीकडे नेदरलँडने पोलंडचा 2-1 ने पराभव केला पण कमी गुणसंख्येमुळे पुढील फेरीत प्रवेश मिळविण्यास ते अयशस्वी ठरले.
उपांत्यफेरी गाठणारे अन्य दोन संघ स्पेन आणि फ्रान्स आहेत. स्पेनने जर्मनीचा 6-0 आणि फ्रान्सने स्वीडनचा 4-2 असा पराभव करत उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे.