बेरोजगारीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे आंदोलन

पुणे – वाढत्या बेरोजगारीला कमी करण्यात राज्य व केंद्र सरकार सपशेल अपयशी ठरले असल्याच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे रेल रोको आंदोलन करण्यात आले.

केंद्र व राज्य सरकारचा नाकर्तेपणा, राबविलेली चुकीची धोरणे, फसव्या योजना यामुळे देशाचा विकासदर कमी झाला आहे. याचा थेट परिणाम उद्योग व नोकऱ्यांवर झाला असून बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनला आहे. या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब भाई शेख, कार्याध्यक्ष रवीकांत वरपे आणि सूरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेस येत्या गुरुवारी दि.१९ जून रोजी दुपारी रास्ता पेठेतील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राला (एम्प्लॉयमेंट ऑफिस) टाळे ठोकणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.