डोळ्यात गुलाल जाऊन जखमी झालेल्या अफ़वानच्या मदतीसाठी राष्ट्रवादी

अमोल लोहकरे यांनी केली पाच हजारांची आर्थिक मदत

जामखेड : कर्जत-जामखेड विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी आमदार रोहित पवार यांच्या विजयाचा जामखेड शहरात मोठा गुलालची उधळण करीत जल्लोष करण्यात आला होता. यावेळी कोर्ट रोडवरील मोगलपुरा येथे राहणारा अफवान जाहिद शेख, वय 10 वर्षे या बालकाच्या डोळ्यात गुलाल गेल्याने डोळ्यात इजा झाली होती.

घरची परिस्थिती हलाखीची असल्याने हमाली करणाऱ्या वडिलांनी व्याजाने पैसे घेऊन आपल्या लहान मुलावर उपचार केले. याची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अमोल लोहकरे यांनी धाव घेत पाच हजाराची आर्थिक मदत करून शेख कुटुंबियांना हातभार लावला आहे.

कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाच्या निकालाच्या दिवशी आमदार म्हणून रोहित पवार निवडून येताच जामखेड शहरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शहरात ठिकठिकाणी गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला. यांचं दरम्यान अफवान शेख या दहावर्षीय मुलाच्या डोळ्यात गुलाल गेल्याने अफ़वान यांच्या डोळ्याला गंभीर इजा झाली होती.

जामखेड बस स्थानकात हमाली करणारे अफ़वानचे वडील जाहीद शेख यांनी शहरातील झगडे हाॅस्पिटल मध्ये उपचार सुरू केले होते. मात्र परिस्थितीत हलाकीची असल्याने व्याजाने पैशे घेऊन अफ़वानवर उपचार करत असल्याची ही बाब कार्यकर्त्यांना समजली. त्यानंतर त्यानी अफ़वान जाहिद शेख यांच्या घरी जाऊन 5 हजार रुपयांची आर्थिक मदत करून त्याच्या उपचारासाठी हातभार लावला आहे.

यावेळी अमरनाथ डोंगरे. गिरीश काथवटे. महेश नगरे. अनिल लोहकरे. दत्ता चव्हाण. गणेश खटावकर. महेश कस्तुरे. विजय कल्याणकर. अंकुश बरबडे. अमोल कचरे. भास्कर खेत्रे.आदी नागरिक उपस्थित होते

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here