राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी दाखल

मुंबई : गॅंगस्टर इक्‍बाल मिर्चीची पत्नी आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी ज्या कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या सापडल्या होत्या. ती कागदपत्रे मिळाल्यावर ईडीने पटेल यांच्याविरोधात चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, आज सकाळी प्रफुल्ल पटेल ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले आहेत.

अंडरवर्ल्ड गुंड दाऊद इब्राहिमचा साथीदार असलेल्या मिर्चीच्या बेकायदेशीर मालमत्तांच्या चौकशीप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने पटेल यांना 18 ऑक्‍टोबरला कार्यालयात हजर राहण्यासाठीचे समन्स बजावले होते. त्यानुसार आज सकाळी ते कार्यालयात हजर झाले आहेत.

1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील एक आरोपी आणि अमली पदार्थांचा तस्कर इक्‍बाल मिर्ची यांचे काही वर्षांपूर्वी लंडनमध्ये निधन झाले. पटेल, त्यांची पत्नी आणि हजारा मेमन यांच्या रिअल इस्टेट कंपनीत झालेल्या कराराप्रकरणी आज ईडीकडून पटेल यांचा जबाब नोंदवण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान, ईडीकडे पटेल आणि हजारा इक्‍बाल मेमन (मिर्चीची पत्नी) यांच्या स्वाक्षऱ्या असलेली काही कागदपत्रे आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या भ्रष्टाचाराच्या महान घटनांचा ट्रॅक रेकॉर्ड आहे, त्यामुळे त्याबाबत राज्याला चिंता करावी लागेल, असे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी म्हटले होते. कोणत्याही कारणाशिवाय कोणताही तपास केला जात नाही. तपास यंत्रणांना काही माहिती मिळाली असावी. आम्ही पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशीच्या बाजूने आहोत, त्यामुळे आम्ही त्यात हस्तक्षेप करणार नाही, असेही गोयल यांनी म्हटले.

Leave A Reply

Your email address will not be published.