कुडाळ नगर परिषदेवर राष्ट्वादीचा झेंडा

   भाजप उमेदवार मालोजी शिंदे यांचा 5 हजार 488 मताधिक्याने पराभव

सातारा –  कुडाळ जिल्हा परिषद गटाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे दीपक पवार यांनी या  भाजप उमेदवार मालोजी शिंदे यांचा 5 हजार 488 मताधिक्याने पराभव केला. दीपक पवार यांना 9923, तर मालोजी शिंदे यांना 4434 मते मिळाली.

आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी जिल्हा परिषद सदस्यपदाचा राजीनामा देऊन दीपक पवार यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांनी जावली विधानसभेतून निवडणूक लढवली होती.

शशिकांत शिंदे होमपिचवर सक्रीय झाल्याने आमदार शिवेंद्रराजे भोसले अधिक सावध झाले होते. त्यामुळे त्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. परंतु मालोजी शिंदे यांच्या दारूण पराभवामुळे भाजपला धक्का बसला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.