राष्ट्रवादी – कॉंग्रेसचे शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला

राष्ट्रवादी – कॉंग्रेसचे शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला
मुंबई : महाराष्ट्रातील सत्तास्थापनेस होणाऱ्या विलंबाच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने मंगळवारी सायंकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांची भेट घेतली. यावेळी राज्यातील सत्तास्थापनेच्या पेच प्रसंगासह राज्यात आलेल्या अवकाळी पावसाच्या संकटावर चर्चा करण्यात आली.

या शिष्टमंडळात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार, छगन भुजबळ, मोहन जोशी, यांचा या समावेश होता. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेनतील सत्ता वाटपाच्या वादात राज्यात सत्ता स्थापन झाली नाही. नऊ नोव्हेंबरपुर्वी सरकार स्थापनेचा दावा दाखल करावा लागणार आहे.

शिष्टमंडळाने राज्यपालांशी या परिस्थीतीबाबत माहिती दिली. राज्यात अवकाळीचे संकट मोठे आहे. त्यामुळे नवीन सरकार स्थापन होणे आवश्‍यक असल्याचे राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिले. त्याचबरोबर राज्यात अवकाळी पावसाने झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची माहिती देण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.