दुष्काळी प्रश्‍नांवरून शेवगावमध्ये राष्ट्रवादी आक्रमक

मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करणार ः चंद्रशेखर घुले

शेवगाव – शेवगाव शहर व तालुक्‍याचा विस्कळीत झालेला पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करावा तसेच शेवगाव-पाथर्डी, शहरटाकळी, बोधेगाव या प्रादेशिक नळ योजनेची वीज बिले शासनाने भरावित, जनावरांना देण्यात येणारे खाद्य प्रति जनावर 25 किलो मिळावे आदि प्रमुख मागण्याची पूर्तता करावी, या मागण्याचे निवेदन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी तहसीलदारांना दिले. या मागण्या मान्य न झाल्यास पक्षाच्यावतीने आंदोलन करण्याचा इशारा घुले यांनी दिला आहे.

तहसीलदार डॉ. विनोद भामरे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी झालेल्या चर्चेत वरखेड सांगवी तसेच शेवगावच्या वाड्या-वस्त्यांना दहा पंधरा दिवसात पाणीपुरवठा केला जातो. तीन दिवसात टॅंकर सुरू करावेत, या शिवाय खरडगाव येथील 750 शेतकऱ्यांना 6 हजार 800 प्रमाणे आलेले दुष्काळी अनुदान तलाठ्याच्या हलगर्जीपणामुळे फक्त 50 शेतकऱ्यांना मिळाले असून सातशे शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांना उपलब्ध करू देण्यात यावे.

लोळेगाव येथे पशुपालकांच्या आग्रहाखातर सुरू करण्यात आलेली छावणी 45 दिवस झाले तरी तिला परवानगी दिली गेली नाही असा भेदभाव खपवून घेतला जाणार नाही, असेही घुले यांनी ठणकावले. यावेळी ज्ञानेश्‍वरचे संचालक काकासाहेब नरवडे, जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, ताहेर पटेल, अरुण पाटील लांडे, पालिका पाणीपुरवठा सभापती उमर शेख, सभापती कैलास तिजोरी, नगरसेवक विकास फलके, अजय भारस्कर, भाऊसाहेब लिंगे, भाऊसाहेब कोल्हे, देविदास पाटेकर, शिवाजीराव गवळी, जमीर पटेल, बाबासाहेब पठाडे, भगवान डावरे, नानासाहेब मडके, सचिन देवढे आदी उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.