#NationalCrush: का होतायेत ‘रश्मिका मंदाना’चे ‘हे’ फोटो सोशलवर व्हायरल! फॅन्स म्हणाले…

मुंबई – कर्नाटक चित्रपटसृष्टीत मधून आपल्या करिअरची सुरवात करणारी अभिनेत्री ‘रश्मिका मंदाना’ सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती नेहमीच इंस्टाग्रामच्या माध्यमातून आपल्या फॅन्सच्या संपर्कात राहते.

रश्मिकाने नुकतंच आपल्या आगामी ‘मिशन मजनू’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली. पण ती तिच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढूनही आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहत आहे. रश्मिकाने काही दिवसांपूर्वी ‘नॅशनल क्रश ऑफ इंडिया 2020’ किताब पटकावला आहे.

दरम्यान, आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून रश्मिकाने सोशलवर काही फोटो शेअर केले असून, तिचा स्पोर्टी लुक सर्वांसमोर आला आहे. यापूर्वी अशाप्रकारचा तिचा फोटो कधीही इंटरनेटवर व्हायरल झाला नव्हता. तिच्या या स्पोर्टी लुकमध्ये ती खूपच कुल दिसत आहे. 

रश्मिकाला फिटनेसचा चांगलाच छंद आहे. स्वतःला फिट ठेवण्यासाठी रश्मिका जिममध्ये तासन् तास घाम गाळताना दिसते. शेअर केलेल्या या फोटोंमध्ये ती अतिशय सुंदर आणि मादक दिसत आहे. फॅन्सनी तिच्या या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. 

गुगलवर ‘नॅशनल क्रश ऑफ इंडिया 2020’ सर्च केल्यास रश्मिका मंदानाचे नाव समोर येते. 2016 साली प्रदर्शित झालेला ‘किरिक पार्टी’ या चित्रपटातून रश्मिकाने चित्रपटसृष्टीत आपले पाऊल टाकले. रश्मिकाचा हा पहिलाच चित्रपट सुपरहिट ठरला होता.

रश्मिका साऊथ इंडिस्ट्रीतील एक लोकप्रिय नाव आहे. याआधी ती ‘कर्नाटक क्रश’ म्हणून ओळखली जायची. पण आता तिची लोकप्रियता राष्ट्रीय स्तरावर पोहोचली असून, ती आता नॅशनल क्रश ऑफ इंडिया झाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.