सायबर क्राईम विषयावर राष्ट्रीय वेबिनार ; पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांचे मार्गदर्शन

पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मामासाहेब मोहोळ महाविद्यालयाच्या वतीने एकदिवसीय सायबर क्राईम या विषयावर वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. या वेबिनार मध्ये देशातील विविध राज्यांमधून सहभाग नोंदवला गेला.

या वेळी यशस्वी यादव( महानिरीक्षक, सायबर सुरक्षा), डॉ. शिवाजी पवार ( सहाय्यक पोलीस आयुक्त), संदिप गादिया (सायबर गुन्हे अन्वेषण तज्ञ) पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे ऍड. संदिप कदम ( मानद सचिव) अँड.मोहनराव देशमुख ( खजिनदार ), आत्माराम जाधव ( सहसचिव) प्राचार्य डॉ. बालकृष्ण झावरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

वेबिनारच्या प्रस्ताविकात सायबर क्राईमची व्याप्ती, त्याबाबत घ्यावयाची सुरक्षितता अशा अनेक पैलूंवर या वेबिनारमधून आपल्याला निश्‍चितच फायदेशीर ठरेल” असे प्राचार्य व वेबिनारचे आयोजक, डॉ. बाळकृष्ण झावरे यांनी सांगितले. या राष्ट्रीय वेबिनार चे मुख्य संयोजक प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे, सह-संयोजक प्रा.अनिल दाहोत्रे , डॉ.योगेश पवार (शारीरिक संचालक),प्रा अशोक शेळके, प्रा तानाजी जाधव, अधीक्षक हरी सोलंकी वेबिनारचे सूत्रसंचालन डॉ.सपना राणे यांनी केले तर आभार डॉ.श्रीनिवास इप्पलल्ली यांनी मानले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.