भोपाळ : भारताचा आघाडीचा नेमबाजपटू सौरभ चौधरीने भोपाळ येथील ६३ व्या राष्ट्रीय नेमबाजी अंजिक्यपद स्पर्धेत पुरूषांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक पटकावले. उत्तर प्रदेशच्या १७ वर्षीय सौरभने २४६.४ गुण पटकावत अव्वलस्थान प्राप्त केलं.
याच स्पर्धेत हरियाणाच्या सरबज्योत सिंह याने २४३.९ गुणांसह दुसरे स्थान पटकावत रौप्यपदक तर अभिषेक वर्माने कांस्यपदक जिंकले.
अभिषेक आणि सरबज्योत यांनी हरियाणाकडून खेळताना सांघिक गटातही सुवर्णपदक पटकावले. सरबज्योतने ज्युनियर पुरूष गटात देखील सुवर्णपदक मिळवलं.